श्री.गजानन महाराज मंदीर शेगांव
माघ वैद्य सप्तमी 23 फेब्रुवारी, 1878 रोजी पातुरकरांच्या वाडयाशेजारील भव्य वटवृक्षाखाली श्री संत गजानन महाराज प्रगट झाले. परब्रम्हाचं हे परिपुर्ण सगु तेजस्वी रुप इथच प्रगटलं आणि पाहता पाहता विश्वरुप होऊन गेलं या पुरातन वटवृक्षासमोर श्री.गजानन महाराज संस्थान यांनी प्रगटस्थळ वास्तुची स्थापना केली. हे प्रगटस्थळ संगमरवरी दगडातून अतिशय आकर्षकपणे कल्पकतेने साकारले आहे. येथेच संस्थानने एक भव्य हॉल उभारला असुन ही वास्तु लोकोपयोगी कार्य म्हणुन मंगल कार्यासाठी उपयोगात आणता येते.
इसवी सन 1908 मध्ये श्री गजानन महाराजांच्या समक्ष व संमतीने श्री गजानन महाराज संस्थानाची स्थापना झाली. अतिशय शिस्तबध्द सेवा यंत्रणा, मनोभावे आणि निरलसपणे कार्य करणारे सेवेकरी आणि साक्षात श्रींचा वरदहस्त या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन श्री गजानन महाराज संस्थान शेगांव या संस्थेचा कार्यरुपी वटवृक्ष विस्तारलेला आहे. जातीभेद, उच्चनिच्चता या सर्वत्र आढळणा-या गोष्टींना थारा न देता सेवा हीच साधना या सिध्दांताने आजपावेतो संस्थानने असाध्य ते साध्य करुन दाखविलेले आहे.
संपर्क तपशील
पत्ता: श्री.गजानन महाराज मंदीर शेगांव जि. बुलढाणा
वेबसाइट दुवा: https://www.gajananmaharaj.org/

कसे पोहोचाल?
विमानाने
जवळचे विमानतळ: जवळचे विमानतळ: छत्रपती संभाजीनगर विमानतळ (220 किमी), नागपूर विमानतळ (314 किमी)
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्टेशन: शेगाव (2 किमी)
रस्त्याने
जवळचे बस स्थानक: शेगाव बस स्टँड (1 किमी)