बंद

    शिक्षण विभाग (प्राथमिक)

    बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इ.1 ली ते 7 वी च्या मुलांना व मुलींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात. इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना बुलढाणा जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत राबविल्या जातात.