कृषी विभाग
कृषि विभागाचे विभाग प्रमुख, कृषी विकास अधिकारी (वर्ग-1) आहेत. त्यांच्या मदतीस जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य वर्ग-2), मोहिम अधिकारी (वर्ग-2), जिल्हा कृषी अधिकारी विघयो वर्ग-2), असे तीन राजपत्रित अधिकारी शासनाने नेमलेले आहेत. कृषी विभागाचे काम सुरळीत होण्यासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती अंतर्गत कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) हे कर्मचारी गट विकास अधिकारी यांचे अधिनस्त काम पाहतात. त्यांच्यामार्फत कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होणे व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे.