शबरी आवास योजना- ग्रामीण
योजनेबाबत :-
अनुसूचित जमाती घटकांसाठी घरकुल योजना लाभ देण्याकरीता दिनांक २८ मार्च २०१३ च्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यामध्ये शबरी आवास योजना राबविण्यात येत आहे.
स्वरुप :-
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातर्गत येणा-या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रातील जिल्हयातील अनुसचित जमातीच्या पात्र लाभाथ्यर्थ्यांना घराचे २६९.०० चौ. फूट चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करुन देणे. यामध्ये एक बैठकीची खोली (३.१४ द २.४५ मी.), स्नानगृह व शौचालय यांचा समावेश राहील.
योजनेचे अनुदान-
१) शबरी आवास योजनेतर्गत प्रति घरकुल अनुदान साधारण क्षेत्र रु १.२० लक्ष व डोंगराळ क्षेत्रासाठी रु १.३० लक्ष निश्चित करण्यात आली आहे.
२) स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सदर योजनेतील लाभार्थ्यांकरीता शौचालय बांधकामाकरीता रु १२,०००/- निधी ची तरतूद आहे.
३) घरकुल सहायता व्यतिरिक्त घरकुल बांधकाम करीता मनरेगा अंतर्गत ९०/९५ दिवसाचे अकुशल मजुरीचे तरतूद आहे.
पात्रता/निकष :-
१) लाभार्थी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा.
२) लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
३) लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे,
४) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्राकरिता रुपये १.२० लाख रुपये ठरवून देण्यात आलेले आहे.
५) शक्यतो लाभार्थीची स्वतःची कमीत कमी २६९ स्के. फूट जागा असावी अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधण्यात येईल,
६) सदर योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो.
७) जागा कमी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणचे सर्व पात्र इच्छुक लाभार्थी मिळून दोन पेक्षा जास्त एकत्रित बांधकाम ग्रुप हाऊसिंग करता येऊ शकते.
८) शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
९) सामाजिक व आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ च्या प्रपत्र ड मध्ये असलेले अनुसूचित जमाती जे लाभार्थी शबरी आवास योजनेचे ग्रामीण अद्ययावत निकष पूर्ण करत असतील असे लाभार्थी शबरी आवास घरकुल ग्रामीण या योजनेत लाभार्थी म्हणून पात्र असतील.
लाभार्थी:
उक्त नमुद केल्यानूसार
फायदे:
उक्त नमुद केल्यानूसार
अर्ज कसा करावा
—