दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY NRLM)
समुदाय संघटनाच्या माध्यमातून गावातील गरीब, गरजू व वंचित कुटुंबातील महिलांचे स्वयं सहाय्यता समुह (SHG) तयार करून सदर समुहाचे गावनिहाय ग्रामसंघ (VO) तयार करण्यात येत आहेत. तसेच जिल्हापरिषद प्रभाग स्तरावर प्रभाग संघाची (CLF) ची निर्मिती करण्यात येते. तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक गटाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाकडे शाश्वत उपजीविकेचे किमान ३ स्त्रोत निर्माण करून त्या कुटुंबाचे दरवर्षी किमान उत्पन्न एक लक्ष एवढे व्हावे या साठी प्रयत्न करण्यात येतो. ग्रामसंघाच्या माध्यमातून विविध पथदर्शी प्रकल्प राबविणे, शासकीय योजनेचा लाभ मिळविणे, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची भागिदारी वाढविणे, समुदाय संसाधन व्यक्तीची निवड करून त्यांची क्षमता बांधणी करणे, गावविकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये महिलांना समाविष्ट होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, महिला समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनास वेगवेगळ्या पद्धतीने बाजारपेठ मिळवून देण्याचे तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम अभियानामार्फत करण्यात येत आहे.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
—