अंबाबारवा अभयअरण्य
इंग्रज काळापासूनअंबाबारवा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. त्यास महाराष्ट्र शासनाने अभयअरण्य म्हणून घोषित केले आहे. या अंबाबारवाला जातांना बदरझरा, पिंपळखेड, चिंचखाडी असे अनेक निसर्गरम्य ठिकाण लागतात. सुदंर सुर्यास्त दिसतो. समुद्रसपाटी पासुन हे ठिकाण उंचीवर आहे. सातपुडयाच्या जंगलात विविध वृक्षांच्या जाती आहेत तसेच अनेक कंदमुळे आहेत. सातपुडयाच्या या जंगलात वाघ, हरीण, रानडुक्कर, सांबर, निलगाय, अस्वल, रोही ई हे प्राणी आहेत. तर मोर, लांडोर, तितर, कबुतर, कोकिळा, पोपटमैना, पारवा, होलगी ई. पक्षी आहेत.
संपर्क तपशील
पत्ता: अंबाबारवा अभयअरण्य जि. बुलढाणा

कसे पोहोचाल?
विमानाने
जवळचे विमानतळ: जवळचे विमानतळ: छत्रपती संभाजीनगर विमानतळ (266 किमी), नागपूर विमानतळ (288 किमी)
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्टेशन: शेगाव (45 किमी) जवळचे बस स्थानक: वासाळी बस स्टँड (2 किमी)
रस्त्याने
जवळचे बस स्थानक: वसाली बस स्टँड (2 किमी)