सामान्य प्रशासन विभाग
सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषदेअंतर्गत अत्यंत महत्वाचा विभाग असुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) हे विभागाचे खातेप्रमुख आहेत. प्रशासकीय /आस्थापना विषयक बाबतीत सबंधित खातेप्रमुख व कार्यालय प्रमुखाकडून नियमित कार्यवाही केली जाते. सदर खात्याकडून (बदल्या,नियुक्ती,पदोन्नती, खातेचौकाशी, न्यायालयीन प्रकरणे, माहिती अधिकार, अंदाजपत्रके, जि.प. कडील विविध योजना, गोपनीय अहवाल, दौरा दैनंदिनी /कार्यालयीन शिस्त, उपस्थिती इत्यादी ) प्राप्त नस्तीवर प्रशासकीय अभिप्राय सामान्य प्रशासन विभागाकडून नोंदविले जातात. वेळोवेळी प्राप्त होणारे शासन निर्णय /अधिनियम/कायदे /नियम /अध्यादेश /परिपत्रकाप्रमाणे वर नमूद बाबींवर कार्यवाही करण्यात येते.