पशुसंवर्धन विभाग
बुलढाणा जिल्हयात एकुण 13 तालुक्याचा समावेश असुन जिल्हयाची लोकसंख्या 2232480 एवढी आहे. या जिल्हयात औद्योगिक कारखाने व रोजगार निर्मीतीचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेती सलग्न दुग्ध व्यवसाय हे शेतीला जोड धंदा म्हणुन नियमीत रोजगार उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त असा व्यवसाय आहे. पशुधन ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्यांचे संरक्षण व संवर्धनाकरीता व विकासाकरीता पशुसंवर्धन विभागामार्फत निरनिराळया योजना राबवीण्यात येतात. त्यात संकरीत गोपैदास कार्यक्रम, रोग प्रतिबंधक लसीकरण व रोग नियंत्रण पशुरुगण सेवा , वैरण विकास कार्यक्रम , कुक्कुट विकास कार्यक्रम, दुर्बल घटकातील गरजु शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे, योळी गटाचे वाटप, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी योजनांचा प्रामुख्याने समावेश होता.