बंद

    जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा

    केंद्र पुरुस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी ACT 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अन्वये करण्यात आलेली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दारिद्रय रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचाविण्याकरीता विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अर्थसहाय उपलब्ध करुन दिले जाते. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे करीता शासन निर्णय क्र.जिग्राप 2003/प्र.क्र.1743/योजना-5 मंत्रालय मुंबई-400 032 दि.17 मार्च, 2004 अन्वये नविन आकृतीबंध लागु करण्यात आलेला आहे.