ग्रामपंचायत विभाग
जिल्हा परिषदेचे ग्रामीण विकासाचे प्रमुख घटकामध्ये पंचायत विभागाचा समावेश होतो. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेंतर्गत गाव पातळीवर जनतेच्या अत्यंत निकट अशा ग्राम पंचायत अधिकारी यांची आस्थापना तसेच गावपातळी वरील जिल्हयाचे प्रश्न सोडविणारी आस्थापना या विभागांतर्गत कार्यरत आहे. ग्राम पंचायत मार्फत जिल्हा परीषदेच्या विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यात येतात. तसेच ग्रामपंचायत व पाणीपुरवठा कर वसुली बाबतसुध्दा हा विभाग नियंत्रण ठेवतो. बुलढाणा जिल्हया मध्ये एकुण 870 ग्रामपंचायत आहेत.