बांधकाम विभाग - जिल्हा परिषद, बुलडाणा

 

दिनांक 1 मे 1962 ला जिल्हा परिषद स्थापन झाली असुन तेव्हापासुन बांधकाम विभाग परिषदेच्या इतर खात्याप्रमाणे एक खाते आहे. बांधकाम विभागांतर्गत सहा उपविभाग व तेरा पंचायत समित्या आहेत. कार्यकारी अभियंता हे या विभागाचे खातेप्रमुख आहेत.

सेवाजेष्ठता यादी

बांधकाम विषय समिती

बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती

 

बांधकाम विभागाकडील कामकाजाबाबत  सर्वसाधारण माहिती

बांधकाम विभागामार्फत होणारी कामे योग्य प्रकारे करुन घेण्यासाठी या विभागामध्ये तीन शाखा आहेत. 

आस्थापना शाखेमध्ये कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबी, रजा प्रकरणे, वार्षिक वेतनवाढ, वेतनदेयके, प्रवास भत्ता देयके, वेतननिश्चिती, सेवानिवृत्ती प्रकरणे, बदल्या, नियुक्त्या, माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही केली जातात.
लेखा शाखेमध्ये कंत्राट दारांच्या कामाची देयके पारीत करणे, नोंदवहया, हिशोब ठेवणे, भांडार शाखेत वस्तु खरेदी करणे, हिशोब ठेवणे  इ. कामे केली जातात.
तांत्रिक शाखेमध्ये प्राकलनास मंजुरात देणे, विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनेची कामे विभागातील शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचेकडून पहिली जातात.

 

बुलडाणा जिल्हा परिषदेअंतर्गत 13 तालुके असुन बांधकाम विभागांर्तगत सहा उपविभाग आहेत. बुलडाणा, खामगांव, मेहकर, मलकापूर, दे.राजा, जळगांव जामोद या विभागाची कामे पाहिली जातात.