शिक्षण विभाग (माध्यमिक )- जिल्हा परिषद, बुलडाणा

 

महाराष्ट्र  शासनाच्या  शालेय  शिक्षण विभागाच्या अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग कार्यरत असून सदर

विभाग जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असतो.  सदर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासन मान्य माध्यमिक शाळा चालू असून यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित असे प्रकार असून विविध माध्यमांच्या संस्थांतर्गत शाळा असतात. यामध्ये इ. 5 वी ते इ. 10 वी, इ. 5 वी ते इ. 12  वी, इ. 8 वी ते इ. 10, इ. 8 वी ते इ. 12 वी अशा प्रकारच्या शाळांचे प्रशासन या विभागामार्फत चालविले जाते. 

वरील सर्व शाळांच्यामध्ये शासनाच्या समाजाभिमुख  विद्यार्थीभिमुख अशा अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. प्रतिवर्षी शासन निकषानुसार पदनिश्चिती केली जाते व त्यानुसार अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन वेतनपथकामार्फत अदा केले जाते. वेतन  पथक व  माध्यमिक शिक्षण विभाग या दोन्हीचाही विभागप्रमुख म्हणुन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) काम पाहतात व त्यांचे अधिनस्त असलेले अधिकारी/कर्मचारी यांच्या सहकार्याने विविध योजना लाभार्थीपर्यंत पोहोचविल्या जातात.

शिक्षण विभाग (माध्यमिक ) यांचेमार्फत राबविण्यात येणा-या महत्वपूर्ण योजनांची माहिती

जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांची यादी