पशुसंवर्धन विभाग - जिल्हा परिषद, बुलडाणा

 

विभागाची रचना

विभागापुढील उदीष्ठे :-
1. अस्तित्वातील पशुपालन पध्दतीनुसार पशुधनामध्ये शास्त्रोक्त पध्दतीचा वापर करुन अनुवांशिक सुधारणा घडविणे व पशुधनाची उपयुक्तता वाढविणे आणि नामांकित देशी गोवंशाचे जतन करणे.
2. पशुंच्या रोगावर प्रभावी नियत्रंण ठेवणे तसेच रोगाचे प्रादुर्भाव टाळण्यास प्राधान्य देवुन आवश्यक उपाययोजना करणे, सुधारीत व किफायतशिर अशा शास्त्रोक्त पशुपालन पध्दतीबाबत ग्रामिण भागातील शेतकरी, पशुपालकांचे प्रबोधन करुन त्याकडे त्यांना उद्युक्त करणे, पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये उपयुक्त स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.
3. पशुजन्य उत्पादनाच्या निमिर्ती तसेच निर्यातीसाठी मोठी क्षमता असलेल्या भागामध्ये पशुधन रोगमुक्त ठेवण्यासाठी रोगमुक्त प्रभागाची निमिर्ती करणे व यानुसार पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातील चालना देणे.

राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विमा योजना :-
राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत केंद्र पुरुस्कृत राष्ट्रीय पशुधन विमा योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गाय, देशी /संकरीता ,म्हैस,बैल, शेळी, मेंढी,धाडे,ससे ई. पशुंच्या विम्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पशुधनाचे मुल्य सामान्यपणे गायीसाठी प्रतिलिटर रु 3000/- व म्हशीसाठी रु 4000/- प्रतिलिटरप्रमाणे ग्राहय राहील. विमा हप्त्यांचा दर एक वर्षाकरीता 2.45 टक्के तर तिन वर्षाकरीता 6.40 टक्के राहील. तसेच 14.5 टक्के सेवाकर एकुण प्रिमियमवर वेगळा राहील. योजनेच्या विमा प्रिमियम मध्ये दारीद्रय रेषेखालील अनुसुचित जाती/जमातीतील पशुपालकांस 70 टक्के शासकीय अनुदान तर इतरांस 50 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.
विम्याचे सरंक्षण पॉलीसी कालावधीत पशुधनाचा मृत्यु हा आजारपण, अपघात,आग,विज पडणे, पुर,वादळ, भुकंप,दुष्काळ व दंगलीमुळे झाल्यास नुकसान भरपाई दिल्या जाते. पशुधनाच्या कायमच्या संपुर्ण अपंगत्वासाठी विमा संरक्षण पाहीजे असल्यास 1 टक्का जादा दराने विमा हप्ता आकारला जाईल.

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती

सेवाजेष्ठता यादी

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय संस्थांची माहिती

पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जिल्हा परिषद, बुलडाणा

19 वी पंचवार्षीक पशुगणना 2012