आरोग्य  विभाग - जिल्हा परिषद, बुलडाणा


आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रतिबंधात्मक उपाय करणे व प्रजनन बाल आरोग्यांतर्गत स्त्रि गर्भवती राहिल्यापासून  मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या मृत्युपर्यत विविध वयोगटांमध्ये 50 प्रकारच्या आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे तसेच सर्वांगीण आरोग्य पुरविण्यांची उपाययोजना जनतेच्या सहभागातुन करून अंमलबजावणी करणे. त्याप्रमाणे शासनाच्या 6 राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ऍलोपॅथीक दवाखाने, आयुर्वेदिक दवाखाने आरोग्य पथक यांच्या सहभागाने सर्व नागरिकांना उपचारात्मक सेवा पुरविणे. तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अंतर्भुत आरोग्याशी संबंधित कुटूंब कल्याण नियंत्रण. हिवताप नियंत्रण, पोलिओ, कुष्ठरोग, माता बाल संगोपन नेत्र तपासणी, क्षयरोग नियंत्रण, अंधत्व निवारण, एड्स जनजागृती इ. बाबत आरोग्य कर्मचा-यामार्फत उपकेंद्रात व गृह भेटीत  सेवा पुरविली जाते. तसेच जि.प. आरोग्य विभाग हा सर्व आरोग्य कार्यक्रमांचे नियोजन करून आरोग्य सेवा विषयक बाबींवर नियंत्रण ठेवतो. जिल्हयामध्ये अचानक निर्माण झालेल्या रोगांवर व आपतकालीन परिस्थितीमध्ये  तात्काळ उपाय योजना केली जाते.

विभागाची रचना व कार्यक्षेत्र

सेवाजेष्ठता यादी

          सेवाजेष्ठता यादी सन 2018

 

आरोग्य विभागांतर्गत विविध समित्या व विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना

आरोग्य समिती जिल्हा परिषद, बुलडाणा

PCPNDT कायदा

महत्वाचे दूरध्वनी क्रमांक व ई- मेल आय.डी.