एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग
एकात्मिक बालविकास सेवा योजनेची स्थापना २ ऑक्टोबर १९७५ साली करण्यात आली. जिल्हा परिषद बुलडाणा मध्ये एकूण १४ विभाग आहेत. त्यापैकी महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग आहे. महिला व बालकल्याण विषय समिती मार्फत शासन व जिल्हा परिषदेकडून प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब,विधवा, घटस्फोटीत व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रिया ख-या अर्थाने सबला होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटीनुसार वैयक्तिक व सामूहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.